आपल्या जिल्ह्यातील दहावी बारावीचे बोर्ड परीक्षांचे निकाल अव्वल असून पुढील व्यावसायिक शिक्षणासाठी घेतल्या गेलेल्या प्रवेश परीक्षांमध्ये यशस्वी होण्याचे प्रमाण खूपच नगण्य आहे. दहावी झालेले वय वर्ष १५ – १६ वयोगटातील विद्यार्थी या प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी जिल्हा सोडून किंबहुना राज्य सोडून बाहेर जात आहेत. विद्यार्थ्यांची तिथे होणारी कुचंबणा, शारीरिक – मानसीक त्रास, वातावरण व खाण्यापिण्यातील बदल, आजारपणे या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना व पर्यायाने त्यांच्या पालकांना खूपच त्रासदायक आहेत. या समस्यांवर एकमेव उपाय म्हणजे प्रवेश परीक्षांसाठी दर्जेदार शिक्षण आपल्या जिल्ह्यात उपलब्ध करून देणे!
याचा गांभीर्याने विचार करून सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात “सिंधुदुर्ग अकॅडमीची” स्थापना झाली. अल्पावधीतच JEE, NEET, MHT-CET, NATA यांसारख्या प्रवेश परीक्षांची तयारीचे खात्रीचे ठिकाण म्हणजे “सिंधुदुर्ग अकॅडमी” हे समीकरण तयार झाले.