पुष्पसेन सावंत जुनियर कॉलेज आणि सिंधुदुर्ग अकॅडमीचे कामकाज दररोज सकाळी ९:०० वाजता सुरू होते. अकॅडमीची वेळ ही सकाळी ९:०० ते दुपारी ३:३० अशी आहे. यामध्ये १२:०० ते १२:३० जेवणासाठी ब्रेक असतो.

काम-काजाच्या कालावधीमध्ये State Board तयारी सोबतच NCERT मधून भविष्यात होणाऱ्या प्रवेश परीक्षांची तयारी करून घेतली जाते. हे करत असताना सर्वप्रथम State Board च्या concepts Clear केल्या जातात व त्यानंतर या झालेल्या concepts वर प्रवेश परीक्षेमध्ये (JEE/NEET/MHT-CET) कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो? कोणत्या पद्धतीने विचारला जाऊ शकतो? तो कसा सोडवायचा? अचूक उत्तरापर्यंत लवकरात लवकर कसं पोहोचायचं? हे शिकवलं जातं. त्यासाठी प्रत्येक घटकाच्या अगदी खोलवर जाऊन तो घटक परफेक्ट कसा होईल? त्याचा एप्लीकेशन कसं देता येईल? हे शिकवलं जातं.

अभ्यासक्रम जसा पूर्ण होत जाईल तसा त्या त्या घटकावर पंधरा दिवसातून एकदा सराव चाचणी घेतली जाते. JEE ची तयारी करणाऱ्या मुलांना JEE, NEET किंवा MHT-CET ची तयारी करणाऱ्या मुलांना त्या त्याप्रमाणे प्रश्नपत्रिका दिल्या जातात. प्रत्येक पंधरा दिवसांची परीक्षा झाली की दोन दिवसांच्या आत विद्यार्थ्यांना Marks सांगितले जातात व त्याचबरोबर प्रत्येक परीक्षेचा निकाल विषयवार पालकांना कळवला जातो. त्यामुळे प्रत्येक परीक्षेनंतर आपला पाल्य किती प्रगती करतो हे पालकांना वेळोवेळी समजतं. तसेच पाल्यांच्या प्रगतीसाठी काही विशेष सूचना असतील तर देता येतात.

या सर्व शिस्तबद्ध कार्यपद्धतीमुळे आतापर्यंत देवगड, मालवण, वैभववाडी, कणकवली, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी या जिल्ह्यातील भागातून, कोल्हापूर जिल्ह्यातून सिंधुदुर्ग ॲकॅडमी मध्ये विद्यार्थी प्रवेश घेत आहेत व आपल्या उज्वल भविष्याचा पाया रचत आहेत.

दर्जेदार शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल? विद्यार्थी आपल्या लक्षापर्यंत, उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारी शिस्त, चांगली संगत, वेळेचा सदुपयोग या बाबींकडे विशेष लक्ष दिला जातो व त्याचा फायदा विद्यार्थ्यांना पुढील व्यवसाय अभ्यासक्रम अभ्यासताना होतो. बाहेरच्या मोठ-मोठ्या कॉलेजमध्ये शिकत असणारे विद्यार्थी आपला अनुभव सांगताना निश्चितच त्यांच्या अकरावी बारावी या दोन वर्षात त्यांना लाभलेल्या मार्गदर्शनाचा उल्लेख प्रामुख्याने करतात.

विद्यार्थ्यांना वेळोवेळी तज्ञ मार्गदर्शकांकडून प्रेरणादायी लेक्चर आयोजित केले जातात. काही वेळा विद्यार्थी खूप प्रयत्न करतो तरीसुद्धा त्याच्या अपेक्षेप्रमाणे यश मिळत नाही तेव्हा तो चलबिचल होतो. अशा प्रसंगी वेळीच अशा विद्यार्थ्यांना धीर देण्याची गरज असते. कुठे चुकतंय, कुठे कमी पडतो याची जाणीव करून द्यावी लागते. त्यासाठी आपल्या अॅकॅडमी मध्ये व्यक्तिगत समुपदेशन केले जाते आणि त्याचा सकारात्मक परिणाम मुलांच्या निकालावर होतो.