माझा जिल्हा शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा विकसित झाला पाहिजे ह्या श्री. पुष्पसेन सावंत ह्यांच्या तळमळीतून आपल्या जिल्ह्यातील पहिले डी.एड कॉलेज, डी.फार्मसी कॉलेज, नर्सिंग कॉलेज, डिगस हायस्कूल, बाव हायस्कूल यांची स्थापना झाली. तिथून पुढे जाऊन माझ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे उच्च माध्यमिक शिक्षण मिळावे म्हणून पुष्पसेन सावंत जुनियर कॉलेजची स्थापना नानाजींनी केली. हे सर्व करत असताना पुन्हा एकदा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे आपल्या जिल्ह्यातील दहावी बारावीचे बोर्ड परीक्षांचे निकाल अव्वल असून पुढील व्यावसायिक शिक्षणासाठी घेतल्या गेलेल्या प्रवेश परीक्षांमध्ये यशस्वी होण्याचे प्रमाण खूपच नगण्य आहे.

आपल्या जिल्ह्यातील दहावी झालेले वय वर्ष १५ – १६ वयोगटातील विद्यार्थी या प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी जिल्हा सोडून किंबहुना राज्य सोडून बाहेर जात आहेत. तिथे होणारी विद्यार्थ्यांची कुचंबना, शारीरिक, मानसीक त्रास, वातावरणातील बदल, खाण्यापिण्यातील बदल, आजारपणे या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना व पर्यायाने त्यांच्या पालकांना खूपच त्रासदायक आहेत. या सर्व समस्यांवर एकमेव उपाय म्हणजे ज्या शिक्षणासाठी विद्यार्थी आपल्या आई-वडिलांपासून, घरादारापासून दूर जात आहेत त्याच दर्जाचे शिक्षण आपल्या जिल्ह्यात उपलब्ध करून देणे या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करून सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून सिंधुदुर्ग अॅकॅडमीची स्थापना झाली आणि अल्पावधीतच JEE / NEET / MHT-CET / NATA यांसारख्या प्रवेश परीक्षांची तयारी करण्यासाठीचे दर्जेदार ठिकाण म्हणजे सिंधुदुर्ग अकॅडमी हे समीकरण तयार झाले. आज आपण बघतोय कोणत्याही शासकीय महाविद्यालयामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असेल तर या प्रवेश परीक्षा द्याव्याच लागतात आणि या परीक्षा द्यायच्या तर त्या पद्धतीने अभ्यास करावा लागतो, जिद्द चिकाटी सातत्य या शस्त्रांचा वापर करावा लागतो.

या सगळ्या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी पुष्पसेन सावंत जुनियर कॉलेज आणि सिंधुदुर्ग अकॅडमीद्वारे नियोजनबद्ध कार्यपद्धती आखली आहे. अकरावी बारावीची ही दोन वर्षांची इंटिग्रेटेड बॅच आपण सुरू केली आहे. त्यामध्ये स्टेट बोर्ड च्या अभ्यासक्रमासोबतच NCERT मधून JEE / NEET / MHT-CET / NATA परीक्षांचे कोचिंग असं स्वरूप असणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा म्हणजे सर्वप्रथम उच्चशिक्षित व अनुभवी तज्ञ मार्गदर्शक, सुसज्ज ग्रंथालय, हवेशीर क्लासरूम, अद्ययावत प्रयोगशाळा, अभ्यासिका, स्मार्ट बोर्ड, मीटिंग्स, पर्सनल कौन्सिलिंग इत्यादी सर्व गोष्टी आपण जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत.