Hon. Pushpasen Sawantमा. आ. श्री. पुष्पसेन सावंत
The founders of Indrayani Shikshan Prasarak Mandal Digus and Kalika Shikshan Prasarak Mandal Digus, learned and experienced farmer, community leader, education activist, former MLA, Hon. Pushpasen Sawant aka Nana is the pride of Sindhudurg district. Nana was active in all fields but his passion was farming and raising cows. He used to spend time with farmers cultivating rice and sugarcane. He hail from farmer family, so he was extremely happy while working in the field. Nana’s love for agriculture used to impress the common farmers. He also loved bullock cart racing. He used to have own bullock cart in the competition. For that, they used to bring a pair of bullocks from the western ghat. People of Sindhudurga still miss Nana who was highly active in the fields of agriculture, social causes, politics, etc. Started with small secondary high school Nana leaped up to vocational college, surprising everyone around. Not only his achievements but also his generosity is inspiring for all.

Nana was born in a farming family in Digus (Ta. Kudal, Dist. Sindhudurg) village. He learned only a few grades. He then engaged himself in the home truck business at a young age.

After the death of Hon. M. D. Sawant of Avalegaon, Nana entered politics with his inspiration and motive to solve common man’s problems. In 1978, he won the Zilla Parishad election of Ratnagiri district. Grampanchayat and District Body Members have deep knowledge of rural issues. Nana prioritised task of finding solutions to those problems during the MLA’s career.

Nana had socialist mindset from the very beginning. He frequently came in contact with leaders of socialist thought like B. Nath Pai, Prof. Madhu Dandavate, Mrinal Gore etc. Considering his socialist ideology, respect and trust of people in constituency, he got the Assembly ticket for the Kudal-Vengurle constituency from the Janata Dal Party in 1985. Nana became an MLA by defeating a highly convicted candidate like Sharad Palav of Congress Party. In 1990, he again contested the election from Janata Dala. This time also he was elected.

However, he faced defeat in the 1995 elections. Although defeated in various elections, they did not stop. He devoted himself like earlier in political as well as social work. He stood by people & continued to raise voice for various local issues. Even his mere presence in the people’s activity started to feel valuable. In front of the opponents, he behaved fearlessly as earlier. Despite not having the MLA’s status, Nana continued to fight for the people’s issues. That is why people were not ready to call him ‘Ex MLA’. This  ‘MLA Pushpasen Sawant’ remained his identity forever.

During his career as an MLA, Nana initiated the works of small dams in his constituency. In the villages, roads were built along rivers and canals. Pursued the recognition of Rangana Fort as a tourist center, established village wise societies, opened a milk dairy. He played an important role in bringing the Sindhudurg district headquarters to Oros despite the opposition of many. Further, in the absence of MLAs, he devoted himself to the work of Sonawade-Kolhapur proposed ghat road, Anjeevde ghat road, long pending Talamba project, forest area, Mangaon basin, problems of four-lane highway project victims etc.

Nana founded the Kalika Shikshan Prasarak Mandal in 1981 at his birth place Digus and after that opened Digus High School, Krishi Tantra Vidyalaya D. Ed. College and removed the disadvantage of secondary and vocational education in rural areas. In the year 2006, the first college ‘Shri.Pushpasen Sawant College of D.Pharmacy‘ was opened in Sindhudurg district after establishing Indrayani Shikshan Prasarak Mandal.

21/2/2020 was a very painful day. On the same day, Nana died of a heart attack. His death not only in Sindhudurg but his fans in the whole of Maharashtra mourned. Nana’s circle of fame was so large that even his staunchest opponents joined the huge funeral procession.

Nana’s dream was to establish a degree college of pharmacy and agriculture. Mr. Bhupatsen Sawant, Chairman of Nana’s Big Chiranjeev and Indrayani Shikshan Prasarak Mandal, made that dream come true. Shri.Pushpasen Sawant College of Pharmacy is an integrated college of diploma and degree in ‘Pushpasen Jnanpith’ complex at Humarmala (Anav) near Oros District Headquarters, Shri.Pushpasen Sawant Agricultural College, R.A.N.M. And R. My Nursing School for GNM training, Sindhudurg Educational Academy for JEE, NEET training, Pushpasen Sawant Higher Secondary School are situated in Dimakha and the students educated in these are working in high positions.

Though Nana is not alive today, every corner of Pushpasen Jnanpith is dear to him. Every student is motivated by their achievements.

इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस व कालिका शिक्षण प्रसारक मंडळ डिगस या संस्थांचे संस्थापक, व्यासंगी शेतकरी, समाजाभिमुख नेते, शिक्षण महर्षी माजी आमदार कै.पुष्पसेन सावंत तथा नाना हे सिंधुदुर्ग जिल्ह्याची शान व अभिमान. नाना सर्व क्षेत्रात हिरीरीने वावरले. त्याहुनही अधिक तळमळीने ते शेतीत व गायी गुरात रमले. वेळ काढुन ते भात, ऊसशेती करायचे. मुळात त्यांचा पिंडच शेतक-याचा असल्यामुळे शेतात वावरताना ते कमालीचे खुष असायचे. चार माणसात त्यांच्या गप्पा शेतीवरहि असायच्या. नानांचे शेती प्रेम सामान्य शेतक-यांना प्रभावित करायचे. बैलगाडी शर्यतीची त्यांना आवड होती. स्पर्धेत त्यांची बैलगाडी असायची. त्यासाठी घाटावरुन ते बैलजोडी आणायचे. शेती, समाजकारण, राजकारण आदि क्षेत्रात दमदारपणे वावरणा-या नानांची उणीव अजुनही जाणवते. माध्यमिक हायस्कुल ते व्यावसायिक कॉलेज अशी नानांची शिक्षण क्षेत्रात उतुंग झेप. त्यांचे कर्तृत्वच नव्हे तर दातृत्वहि सर्वांसाठी प्रेरणादायी आहे!

नानांचा जन्म डिगस (ता. कुडाळ, जि. सिंधुदर्ग) गावातील शेतकरी कुटूंबात झाला. मोजक्याच इयत्ता ते शिकले. त्यानंतर तरूण वयात घरच्या ट्रक व्यवसायात त्यांनी स्वत:ला गुंतवून घेतले.

आवळेगावचे श्री. एम. डि. सावंत यांच्या निधनानंतर त्यांच्या प्रेरणेने तसेच सामांन्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी नानांनी राजकारणात प्रवेश केला. १९७८ साली तत्कालीन रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेची निवडणुक ते जिंकले. ग्रामपंचायत व जिल्हा परिषद सदस्यांना ग्रामीण भागातील समस्यांची खोलवर माहिती असते. त्या समस्यांची उकल शोधण्याचे काम नानांनी आमदारकिच्या कारकिर्दीत प्राधान्याने केले.

नानांवर पहिल्या पासुनच समाजवादी विचारांचा पगडा होता. बॅ.नाथ पै, प्रा.मधु दंडवते, मृणाल गोरे आदी समाजवादी विचारांच्या नेत्यांशी त्यांचा वारंवार संपर्क आला. त्यांची समाजवादी विचारसरणी, मतदार संघात त्यांच्या प्रतीचा आदर व विश्वास आदि गोष्टी विचारात घेत १९८५ साली जनता दल पक्षाकडुन त्यांना तत्कालीन कुडाळ-वेंगुर्ले मतदार संघासाठी विधानसभेचे तिकीट मिळाले. कॉंग्रेसच्या बॅ. शरद पालव ह्यांच्या सारख्या उच्च शिक्षीत उमेदवाराचा पराभव करुन नाना आमदार झाले. १९९० साली पुन्हा त्यांनी जनता दलाकडुन निवडणुक लढविली. यावेळीहि ते निवडुन आले.

१९९५ च्या निवडणुकीत मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. नाना निवडणुकीत पराभुत झाले तरी थांबले नाहीत. राजकिय तसेच सामाजिक कार्यात त्यांनी पहिल्या सारखेच स्वत:ला झोकुन दिले. जनतेच्या स्थानिक विवीध समस्यांसाठी आवाज उठवित राहिले. जनतेच्या आंदोलनात त्यांची नुसती उपस्थितीहि मोलाची वाटु लागली. विरोधकांच्या समोर ते पुर्वीप्रमाणेच निडरपणे वावरु लागले. आमदारकीचा बिल्ला नसला तरी नाना जनतेच्या प्रश्नांचा किल्ला लढवित राहिले. त्यामुळेच जनता त्यांना ‘माजी’ म्हणायला तयार नसे. आमदार पुष्पसेन सावंत हिच त्यांची ओळख शेवट पर्यंत राहिली.

आमदारकीच्या कारकिर्दीत नानांनी आपल्या मतदारसंघातील छोट्या धरणांची कामे मार्गी लावली. गावागावात नदि -ओहळांवर साकव, पाणदींचे रस्ते केले. रांगणा गडाला पर्यटन केंद्र म्हणुन मान्यता मिळविण्यासाठी पाठपुरावा केला, गाववार सोसायट्या स्थापन केल्या, दुध डेअरी उघडली. अनेकांचा विरोध पत्करुन सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय ओरोसला आणण्यात त्यांची महत्वाची भुमिका होती. पुढे आमदारकी नसताना सोनवडे कोल्हापुर प्रस्तावित घाट रस्ता, आंजीवडे घाट रस्ता, दीर्घ प्रलंबित टाळंबा पाटबंधारे प्रकल्प, वनसंज्ञा, माणगाव खो-यातील आकारीपड प्रश्न, चौपदरी महामार्ग प्रकल्पग्रस्तांच्या समस्या आदि कार्यात तब्बेतीची पर्वा न करता त्यांनी स्वत:ला झोकुन दिले.

नानांनी जन्मगावी डिगस येथे १९८१ साली कालिका शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना व त्या नंतर डिगस हायस्कुल, कृषी तंत्र विद्यालय डि.एड.कॉलेज उघडुन ग्रामीण भागातील माध्यमिक व व्यावसायिक शिक्षणाची गैरसोय दुर केली. इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करुन २००६ साली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले ‘श्री.पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ डि. फार्मसी’ हे कॉलेज उघडले.

२१/२/२०२० हा दिवस अत्यंत वेदनादायी ठरला. याच दिवशी नानांचे हार्ट अॅटॅकने देहावसान झाले. त्यांच्या निधनाने सिंधुदूर्गच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रातील त्यांचे चाहते हळहळले. त्यांच्या अंत्ययात्रेच्या विराट समुदायात त्यांचे कट्टर विरोधकही सामील होते एवढे नानांच्या प्रसिद्धीचे वलय मोठे होते. नाना आज हयात नसले तरी पुष्पसेन ज्ञानपिठातील प्रत्येक कोपरा त्यांच्यासाठी हळवा आहे. प्रत्येक विद्यार्थी त्यांच्या कर्तृत्वाने प्रेरित आहे.

फार्मसी व कृषीचे पदवी कॉलेज निर्माण करण्याचे नानांचे स्वप्न होते. नानांचे मोठे चिरंजीव व इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. भुपतसेन सावंत यांनी ते स्वप्न पुर्णत्वास नेले. ओरोस जिल्हा मुख्यालयानजीक हुमरमळा (अणाव) येथील ‘पुष्पसेन ज्ञानपीठ’ संकुलात श्री.पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी हे डिप्लोमा व डिग्रीचे इंटीग्रेटेड कॉलेज ,श्री.पुष्पसेन सावंत कृषी महाविद्यालय ,आर.ए.एन.एम. व आर. जी.एन.एम.चे प्रशिक्षण देणारे माई नर्सिंग स्कुल, JEE,NEET प्रशि‌क्षणाची सिंधुदुर्ग शैक्षणीक ॲकेडमी ,पुष्पसेन सावंत उच्च माध्यमिक विद्यालय ही विद्याकेंद्रे दिमाखात उभी असुन ह्यात शिक्षण घेतलेले विद्यार्थी उच्च पदावर काम करीत आहेत.